जात पडताळणी प्रमाणपत्र
Caste Validity Certificate
जात पडताळणी प्रमाणपत्र हे विद्यार्थी, नोकरदार तसेच जे उमेदवार राखीव प्रवर्गातून निवडणूक लढवू इच्छितात त्यांच्यासाठी आवश्यक असे दस्तऐवज आहे. विद्यार्थ्यांना प्रोफेशनल कोर्सेस साठी प्रवेश घेण्यासाठी तसेच अकरावी व बारावी सायन्स मध्ये असताना त्याचबरोबर कोणत्याही डिग्री किंवा डिप्लोमा साठी प्रवेश घेण्यासाठी व स्कॉलरशिप चा फॉर्म भरण्यासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र हे आवश्यक असते. ज्या स्त्री किंवा पुरुषांना राखीव प्रवर्गामध्ये नोकरी करायचे आहे त्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक आहे, तसेच प्रमोशनसाठी ही हे प्रमाणपत्र आवश्यक आहे. निवडणुकीमध्ये उमेदवार जर राखीव प्रवर्गाच्या जागेवरून उभे राहनार असतील तर त्यांना निवडणूक जिंकून आल्यानंतर जात पडताळणी प्रमाणपत्र 6 महिन्याच्या आत सादर करणे बंधनकारक असते अन्यथा त्यांचे पद रद्द होते. अशाप्रकारे फक्त तीन कारणासाठीच जात पडताळणी होत असते इतर कोणत्याही कारणासाठी जात पडताळणी होत नसते काही वेळा शासकीय योजना अथवा अत्यावश्यक परिस्थितीमध्ये जात पडताळणी प्रमाणपत्र साठी अर्ज करता येते.
जात प्रमाणपत्र पडताळणी हे पुढील प्रवर्गातील लोकांसाठी आवश्यक असते अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग, तसेच विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी आवश्यक असते.
फॉर्म भरण्यासाठी लागणारी प्रोसेस पाहूया
सर्वप्रथम खाली दिलेल्या यादीप्रमाणे सर्व कागदपत्रे ओरिजिनल स्वरूपात आवश्यक आहेत त्यानंतर जात पडताळणीच्या वेबसाईटवर ऑनलाइन फॉर्म भरावा लागतो. तसेच सर्व ओरिजनल कागदपत्रे अपलोड करावे लागतात. त्यानंतर ऑनलाईन पेमेंट करून फॉर्म सबमिट करावा लागतो.
यानंतर ऑनलाइन भरलेला अर्ज व पेमेंट भरलेली स्लिप याची प्रिंट काढावी लागते हे सर्व कागदपत्रे जोडून आपला महसूल पुरावा हा ज्या जिल्ह्यातील असेल त्या जिल्ह्याच्या जिल्हा जात पडताळणी समितीकडे जात पडताळणी करण्यासाठी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.त्यानंतर संबंधित जिल्हा जात पडताळणी समितीकडून कागदपत्रे तपासून पेमेंट भरलेले स्लिप ची एक झेरॉक्स प्रत सोबत न्यावी त्यावर जिल्हा जात पडताळणी समिती सही व शिक्का करून देतास त्यास टोकन असे म्हणतात किंवा पोच होती असेही म्हणतात यानंतर कमीत कमी एक महिन्याच्या आत किंवा जास्तीत जास्त तीन महिन्यांच्या आत जात पडताळणी होऊन जात पडताळणी प्रमाणपत्र विद्यार्थ्याच्या/नोकरदाराच्या/उमेदवाराच्या फॉर्म भरताना जो ईमेल आयडी वापरलेला असतो त्या ईमेल आयडीवर भेटतो किंवा काही त्रुटी किंवा समस्या असतील तरीही विद्यार्थ्याच्या ईमेलवर किंवा मोबाइल वर एसएमएस द्वारे कळविण्यात येते तसेच संबंधित त्रुटीची पूर्तता करण्यासाठी जास्तीत जास्त 45 दिवसांचा कालावधी असतो या कालावधीमध्ये संबंधित त्रुटी पूर्ण केल्यास जात पडताळणी समिती पुढील प्रोसेस करते जर संबंधित त्रुटीची पूर्तता 45 दिवसाच्या आत न केल्यास जिल्हा जात पडताळणी समिती आपला जात पडताळणीचा अर्ज अवैध ठरवू शकते.
जात प्रमाणपत्र पडताळणी करण्यासाठी लागणारेप्रवर्गनिहाय कागदपत्रे
1. इतर मागास (OBC) प्रवर्गासाठी सन 1967 पूर्वीचे महसुल व जातिचे पुरावे जोडावे.2. अनुसूचित (SC) जाती साठी सन 1950 पूर्वीचे महसुल व जातिचे पुरावे जोडावे.
3.विमुक्त जाती भटक्या जमाती (VJNT )संबंधित 1961 पूर्वीचे महसुल व जातिचे पुरावे जोडावे.
4.विशेष मागास (SBC) प्रवर्गासाठी सन 1967 पूर्वीचे महसुल व जातिचे पुरावे जोडावे.
याप्रमाणे वरील सर्व प्रवर्गासाठी कागदपत्रे आवश्यक आहेत तसेच सर्व प्रवर्गासाठी जे कॉमन कागदपत्रे आहेत त्याची यादी खालील प्रमाणे आहे
विद्यार्थ्यांची कागदपत्रे
1. जातीचा दाखला2.शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड
3. फॉर्म नंबर 15
4. एक फोटो व सही
5. ई-मेल आयडी आणि मोबाईल आवश्यक आहे
6. आधार कार्ड
7. विद्यार्थ्यांच्या वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला व सही
8. विद्यार्थ्यांच्या आजोबाचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म मृत्यू रजिस्टर मधील उतारा
9. शंभर रुपयाचे दोन स्टॅम्प आवश्यक आहेत त्यामध्ये सेतू किंवा महा ई सेवा केंद्रामध्ये जाऊन जात पडताळणी विषयी एफिडेव्हेट करून घ्यावे
10. चालू घराचा किंवा सातबारा उतारा
11. घरातील कोणतेही व्यक्तीचे जर जात पडताळणी झाले असेल तर जात पडताळणी दाखला.
नोकरी करणाऱ्यांसाठीची कागदपत्रे
1. जातीचा दाखला2.शाळा सोडल्याचा दाखला
3. फॉर्म नंबर 15 व जॉइनिंग ऑर्डर
4. फोटो व सही
5. ई-मेल आयडी आणि मोबाईल आवश्यक आहे
6. आधार कार्ड
7. वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला.
8. आजोबाचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म मृत्यू रजिस्टर मधील उतारा
9. शंभर रुपयाचे दोन स्टॅम्प आवश्यक आहेत त्यामध्ये सेतू किंवा महा ई सेवा केंद्रामध्ये जाऊन जात पडताळणी विषयी एफिडेव्हेट करून घ्यावे
10. चालू घराचा किंवा सातबारा उतारा
11. घरातील कोणतेही व्यक्तीचे जर जात पडताळणी झाले असेल तर जात पडताळणी दाखला.
निवडणुक लढवणारे उमेदवारांसाठी कागदपत्रे
1. जातीचा दाखला2.शाळा सोडल्याचा दाखला
3. फॉर्म नंबर 15 व
4. फोटो व सही निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडील पत्र
5. ई-मेल आयडी आणि मोबाईल आवश्यक आहे
6. आधार कार्ड व मतदान ओळखपत्र
7. वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला.
8. आजोबाचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म मृत्यू रजिस्टर मधील उतारा
9. शंभर रुपयाचे दोन स्टॅम्प आवश्यक आहेत त्यामध्ये सेतू किंवा महा ई सेवा केंद्रामध्ये जाऊन जात पडताळणी विषयी एफिडेव्हेट करून घ्यावे
10. चालू घराचा किंवा सातबारा उतारा
11. घरातील कोणतेही व्यक्तीचे जर जात पडताळणी झाले असेल तर जात पडताळणी दाखला.
अशाप्रकारे वरील सर्व कागदपत्रासह जिल्हा जात पडताळणी समिती येथेसर्व मूळ कागदपत्रासह प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे.

0 टिप्पण्या