प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना




 प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना ही केंद्र शासनाची 100 % अर्थसहाय्य योजना आहे.  अल्प व अत्यल्प जमीन असणाऱ्या गरीब कुटूंबातील शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होणेसाठी व त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी केंद्र शासनाने ही योजना 2018 सालापासून महाराष्ट्र राज्यामध्ये सुरु करण्यात आलेली आहे.

जास्तीत जास्त 2 हेक्टर पर्यंत क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना 2000/- (दोन हजार रुपये ) म्हणजेच वार्षीक रक्कम रुपये 6000/- (सहा हजार रुपये) आर्थिक सहाय्य म्हणून देण्यात येते. 

या योजनेमध्ये केंद्र सरकार वेळोवेळी बदल करीत असतात.  त्यामुळे शेती क्षेत्राची असणारी मर्यादा तसेच पात्र लाभार्थी तसेच त्यांना मिळणारे आर्थिक सहाय्य यामध्ये वेळोवेळी बदल केलेमुळे या योजनेसाठी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांची यादी वेळोवेळी वाढतच गेली आहे म्हणजेच पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या वाढलेली आहे.

तसेच प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेमध्ये काही घटकांना म्हणजेच सरकारी नोकरदार, डॉक्टर, वकील, मंत्री, आमदार, खासदार, कॅबिनेट मंत्री इत्यादी अनेक घटकांना यातून वगळण्यात आलेले आहे.  तसेच केंद्र शासनाने वेळोवेळी दिशानिर्देश दिल्याप्रमाणे काही बदल करण्यात आला आहे.

यासाठी लागणारी कागदपत्रे पुढील प्रमाणे –

  • 1.    आधार कार्ड
  • 2.   आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर
  • 3.   बँक पासबुक
  • 4    7/12 व खाते उतारा
  • 5   शेतजमीन 2 हेक्टर पेक्षा कमी आवश्यक.

 

अश्या प्रकारे सर्व पात्र शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेअंतर्गत अर्ज करुन योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता करुन सदर योजनेचा लाभ घ्यावा.

धन्यवाद!