महिला सन्मान बचत प्रमाणपत्र
महिलांसाठी नवी बचत योजना
Mahila Sanman Bachat Pramanpatra
प्राथमिक माहिती:-
ही योजना फक्त महिलांसाठीच
आहे. यामध्ये केवळ महिलाच गुंतवणूक करू शकतात.
अल्पवयीन मुलगी असेल तर त्या मुलीचे पालक या
योजनेसाठी अर्ज करू शकतात. महिलांनी बचतीला प्रोत्साहन देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश
आहे.
या
योजनेमध्ये कोणतीही महिला दोन वर्षांसाठी जास्तीत जास्त दोन लाख रुपये गुंतवू शकते.
यामध्ये ७.५ टक्के व्याज मिळणार आहे.
कालावधी:-
महिला
सन्मान बचत प्रमाणपत्र मध्ये गुंतवणुक एका वर्षामध्ये जास्तीत जास्त दोन लाख रुपये गुंतवू
शकते.
तसेच
या योजनेमध्ये किमान गुंतवणुकीची मर्यादा १००० रुपये निश्चित करण्यात आली आहे.
महिला
सन्मान बचत प्रमाणपत्र ही एक सुरक्षित बचत योजना आहे. यामध्ये गुंतवणुकीचा कालावधी दोन वर्ष
आहे.
सदरचा
कालावधी पूर्ण झाल्यानंतर तुम्ही फॉर्म-2 ज्याठिकाणी तुम्ही बँक किंवा पोस्ट ऑफिस मध्ये महिला
सन्मान बचत प्रमाणपत्र खाते उघडले आहे त्याठिकाणी सबमिट करून पेमेंट मिळवू
शकता.
महिला
सन्मान बचत प्रमाणपत्र खातेधारक कमाल ४० टक्के अंशतः पैसे काढू शकतात, परंतु तुम्ही खाते उघडल्यानंतर एक
वर्षानंतरच या सुविधेचा लाभ घेऊ शकता.
खाते कोठे काढावे:-
महिला
सन्मान बचत प्रमाणपत्र खाते तुम्ही कोणत्याही बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन उघडू शकता.
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र खाते उघडण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२५
आहे.

0 टिप्पण्या