गॅझेट (Gazette) राजपत्र

(नाव, जन्मतारीख व धर्म बदलणेसाठी)

 

      महाराष्ट्र राज्यामध्ये नाव, जन्मतारीख व धर्म बदलणेसाठी गॅझेट म्हणजेच राजपत्र करावे लागते.  यामुळे ज्यांच्या नावात बदल आहे, जन्मतारखेमध्ये बदल आहे तसेच ज्यांना धर्म बदलायचा आहे किंवा धर्म परिवर्तन केले आहेत अश्यांना गॅझेट करावे लागते.

हे गॅझेट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोठेही नाव, जन्मतारीख व धर्म बदल याचा पुरावा म्हणून चालते. यासाठी खालील प्रमाणे सर्व कागदपत्रे आवश्यक आहेत.  तसेच ऑनलाईन अर्ज करावा लागतो 8 ते 15 दिवसांच्या अंतराने ते मंजूर होते व आपणांस आपले गॅझेट डाऊनलोड करुन घ्यावे लागते.

 

गॅझेट करणेसाठी लागणारी कागदपत्रे

  • o  आधार कार्ड
  • o  रेशन कार्ड
  • o  फोटो व सही
  • o  इतर संबंधित कागदपत्रे
  • o  जातीचा दाखला (मागासवर्गींयांसाठी)