Income Tax Return (ITR) म्हणजे काय


Income Tax Return (ITR)
Income Tax Return (ITR) 
भारतामध्ये राहणाऱ्या ज्या व्यक्तींचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे त्यांना आयटीआर भरणे आवश्यक आहे. आयटीआर भरण्याचे अनेक फायदेही आहेत. ज्यावेळेस तुम्ही आयकर रिटर्न भरता तेव्हा तुम्ही सरकारला कोणत्याही प्रकारचा कर देत नाही. मात्र उत्पन्नाचा एक ठोस व मुख्य पुरावा सादर केलेला असतो.

तसेच आयकर नियमानुसार ज्यांचे उत्पन्न करपात्र असेल तर अशा सर्व नोंदणीकृत करदात्यांना प्रत्येक वर्षाच्या टॅक्स स्लॅबनुसार कर विवरणपत्र म्हणजेच आयटीआर ऑनलाईन भरणे बंधनकारक आहे.

ITR मध्ये दाखल केलेली माहिती ही 1 एप्रिल पासून पुढील वर्षाच्या 31 मार्च पर्यंतच्या झालेल्या सर्व व्यवहाराशी संबंधित असते आणि हि संबंधित सर्व माहिती त्या विशिष्ट आर्थिक वर्षाकरिता लागू असते.

ITR चा फुल्ल फॉर्म

आयटीआर चा फुल्लफार्म Income Tax Return असे आहे व शॉर्टकट नाव ITR आहे तसेच मराठी मध्ये आयकर विवरण पत्र किंवा आयकर रिटर्न असे म्हणतात.

 



 ITR का व कोणी दाखल करावा?

ज्या व्यक्तीचे एका वर्षांमधील उत्पन्न २ लाख ५० हजार पेक्षा अधिक असते त्या व्यक्तीला ITR रिटर्न भरणे कायद्यानुसार अनिवार्य आहे. तसेच आयकर नियमानुसार ज्यांचे उत्पन्न करपात्र असेल तर अशा सर्व नोंदणीकृत करदात्यांना प्रत्येक वर्षाच्या टॅक्स स्लॅबनुसार कर विवरणपत्र म्हणजेच आयटीआर ऑनलाईन भरणे बंधनकारक आहे.

तसेच जर एखाद्या व्यक्तीचे उत्पन्न खूप अधिक आहे आणि त्यांनी आयकर विवरणपत्र भरले नाही तर त्यांना INCOME TAX DEPARTMENT कडून नोटीस येवू शकते आणि त्यामध्ये जर त्यांनी योग्य इनकम दाखवून योग्य तो टॅक्स भरला नाही तर त्यांना त्या टॅक्स च्या रकमेवर दंड, व्याज आणि त्याचबरोबर कायदेशीर कारवाई सुद्धा होऊ शकते. 

 

आयकर रिटर्नमध्ये सामान्यत: उत्पन्नाचे स्रोत, वजावट आणि क्रेडिट, कर भरणे आणि कोणताही कर परतावा किंवा देय शिल्लक यासारख्या तपशीलांचा समावेश असतो.

ITR filing : सर्वांना आयटीआर भरणे बंधनकारक नाही,
पण ITR भरल्यास कोणकोणते फायदे मिळतात.

तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक असेल तर तुम्हाला आयटीआर भरणे बंधनकारक आहे. आयटीआर भरण्याचे फायदेही अनेक आहेत. आयकर रिटर्न भरता तेव्हा तुम्ही सरकारला कुठलाही कर देत नाही. मात्र, उत्पन्नाचा एक ठोस पुरावा सादर केलेला असतो.

आयकर (ITR) रिटर्न भरण्याचे अनेक फायदे आहेत.


1) कर्ज सहज मिळविता येते.

कोणतीही बँक किंवा कर्ज देणाऱ्या संस्था कडून कर्ज घेण्यासाठी आयकर रिटर्न हा उत्पन्नाचा ठोस पुरावा आहे. कर्जासाठी बँक तुमच्याकडे २ ते 3 वर्षांचे आयकर रिटर्न मागते. आयटीआर भरला असेल तर तुम्हाला सहज कर्ज मिळते.

2) व्यवसायासाठी लाभदायक आहे.

कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी आयटीआर महत्वाचे आहे. तसेच जर तुम्हाला कोणत्या विभागाकडून कंत्राट मिळवायचं असेल तर तेव्हाही आयटीआर दाखवावे लागते.

3) नोटीस येण्याची भिती राहत नाही.

जे लोक वेळेवर आयटीआर भरतात त्यांना प्रॉपर्टी खरेदी - विक्री, बँकेत मोठी रक्कम जमा करणे, म्युच्युअल फंडात मोठी रक्कम गुंतवणूक केल्यास तुम्हाला आयकर विभागाकडून नोटीस येण्याची भिती राहत नाही. नियमीत आयकर रिटर्न भरणारे लोक या भितीपासून दूर राहतील. 


4) टीडीएस क्लेम करता येते. 

ज्यावर्षी तुमच्या उत्पन्नावर टीडीएस कापला गेलेला असेल त्यावेळी तो परत मिळवण्यासाठी आयकर रिटर्न भरणे आवश्यक आहे. जर तुम्ही कोणतेही काम करत असाल आणि तुमचे उत्पन्न करपात्र नसले तरीही तुम्हाला पेमेंट देणारा टीडीएस कापू शकतो. अशावेळी आयकर रिटर्न भरून तुम्ही टीडीएस रिफंड घेऊ शकता.

 

5) वास्तव्याचा ठोस पुरावा 

आयकर रिटर्नची प्रत हा तुमच्या वास्तव्याचा ठोस पुरावा आहे. याचा वापर तुम्ही सरकारी कामातही करू शकता. तुम्हाला पासपोर्ट बनवायचा असेल तुम्ही वास्तव्याचा पुरावा म्हणून आयटीआर प्रत देऊ शकता. 


6) क्रेडिट कार्ड मिळविता येते.

आयटीआर भरल्यामुळे क्रेडिट कार्डही सहजपणे मिळू शकेल. क्रेडिट कार्ड देणाऱ्या बँकांना आयकर रिटर्नमुळे ग्राहकांच्या कर्ज घेण्याच्या आणि फेडण्याच्या क्षमतेचा अंदाज येतो.

7) विमा संरक्षण मिळते.

जर तुम्हाला 1 कोटी रुपयांचा विमा (टर्म प्लान) घ्यायचा असेल तर विमा कंपनी तुमच्याकडे आयटीआरची मागणी करु शकते. तुमच्या कडील उत्पन्नाचा स्रोताची माहिती करून घेण्यासाठी आणि नियमीत उत्पन्नाची खात्री होण्यासाठी विमा कंपनी आयटीआरवरच विश्वास ठेवतात.

8) व्हिजा मिळविणे सोपे होते.

जर तुम्हाला नोकरी किंवा व्यवसायासाठी परदेशात जायचं असेल तर तुमच्यासाठी आयटीआर महत्त्वाचे आहे. बहुतांशी परदेशी दुतावास मध्ये व्हिजा अर्जामध्ये मागील २ वर्षांचे आयकर रिटर्न मागतात. जर तुमच्याकडे आयटीआर भरलेले असेल तर इतर लोकांच्या तुलनेत तुम्हाला व्हिजा मिळणे सोपे होते.

ITR File करण्याकरिता आवश्यक कागदपत्रे

1.    आधार कार्ड

2.   पॅन कार्ड

3.   बँक पासबुक

4.  आधार लिंक मोबाईल नंबर

 

आयटीआर भरण्याची तारीख

ITR दाखल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2023 आहे. 

 

समाराेप :-

या लेखामध्ये आपण ITR केंव्हा व कधी भरायचे ITR भरण्याचे फायदे त्याची प्रोसेस त्यासाठी लागणारी कागदपत्रे व शेवटची तारीख याविषयीची माहिती आपण पाहिली आहे.

आपल्याला या लेखाबद्दल काही अडचणी किंवा बदल सुचवायचे असतील तर आमच्या surabhicomputerjath@gmail.com या ईमेल आयडीवर मेल करा किंवा कमेंट मध्ये सुचना करा.